शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

राणेंना पक्षात घेण्याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा; दीपक केसरकर यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:30 IST

नारायण राणे यांना भाजपात घायचं किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असं मत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे जेष्ठ नेते नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात लवकरच न्यायालयासमोर यादी सादर होणार आहे.नारायण राणे यांना भाजपात घायचं किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असं मत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

नाशिक, दि. 14- काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात लवकरच न्यायालयासमोर यादी सादर होणार आहे, त्यामुळे त्यांना भाजपात घायचं किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असं मत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबाबत झिरो टोलरन्स घोषित केलं आहे. अशावेळी ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातील यादी न्यायालयात सादर होणार आहे. त्यामुळे भाजपाने विचार केला पाहिजे, असंही दीपक केसरकर पुढे म्हणाले.

नाशिक येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय जीएसटी व्यापारी परिषदेनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं. दरम्यान, जीएसटीच्या अंमलबजावणीत व्यापाऱ्यांच्या सोयीचे बदल केले जातील. पण त्यासाठी संयम ठेवा, असंही केसरकर म्हणाले.

नारायण राणे यांचे स्वागतच- चंद्रकांत पाटीलएका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचे भाजपामध्ये स्वागतच आहे. मात्र, प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे राज्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.नारायण राणे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत भाजपासमोर कोणत्याही अटी ठेवल्या नाहीत, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.